परंडा -येथील जिल्हा परिषद उर्दु प्रशाला शाळेतील मुलामुलींना शालेय साहित्य वाटप करताना यावेळी निवृत्त क्रिडाशिक्षक शिवाजी कदम,सुलेमान लुकडे,सुर्यभान हाके,इस्माईल करपुडे आदि!
परंडा,ता.२३ (प्रतिनिधी ) शहरातील सहारा बहुउद्देशिय संस्था यांच्या वतीने शहरातील जिल्हा परिषद उर्दु प्रशालेतील पहिली ते दहावीच्या गरजू व होतकरू मुलामुलींना शैक्षणिक साहित्य वह्यांचे वाटप मंगळवार ता.२३ रोजी करण्यात आले.
शहरातील सहारा बहुउद्देशीय सामाजीक संस्था विविध सामाजीक उपक्रमासाठी अग्रेसर असते.उर्दु प्रशालेतील पहिली ते सातवीच्या वर्गासाठी प्रत्येकी सहा वह्या तर आठवी ते दहावीच्या शालेय मुलींना प्रत्येकी सहा रजिस्टर वह्यांचे,शैक्षणिक साहित्य एकुण २०० विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी कार्यक्रमास सेवानिवृत्त जेष्ठ शिक्षक शिवाजी कदम,विस्तार अधिकारी सुर्यभान हाके,सहारा बहुउद्देशीय संस्थेचे सचिव सुलेमान लुकडे,व्हाईस आॕफ मिडीया जिल्हाउपाध्यक्ष प्रकाश काशीद,फारुख शेख,प्रहार संघटना युवा तालुकाध्यक्ष तय्यब शेख यांची उपस्थिती होती. उर्दु शाळा माध्यमातील मुलामुलींना शालेय जीवनात मदत होण्यासाठी शैक्षणिक साहित्य वाटप करत आहे.आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो याच भावनेतुन समाजाचे उत्तदायित्व म्हणुन सहारा सामाजीक संस्था हे कार्य करीत असल्याचे सुलेमान लुकडे यांनी सांगितले.मार्गदर्शन करताना सेवानिवृत्त जेष्ठ शिक्षक म्हणाले की,आजमितीस मुलांपेक्षाही मुलींची गुणवत्ता वाढत आहे.प्रतिकुल परिस्थितीवर मात करीत विविध क्षेञात मुलींनी बाजी मारली आहे.शालेय विद्यार्थींनीनी अभ्यासात सातत्य ठेवुन जिद्द,चिकाटीने यश मिळवावे.कार्यक्रमासाठी सहारा सामाजीक संस्थेचे इस्माईल करपुडे,अमोल क्षिरसागर,मुक्तार हावरे आदिंनी पुढाकार घेतला.यावेळी शिक्षक जमील बांगी,नितीन राजपुत,शिक्षिका समीना दखनी,अंजली चंदनशिवे,यास्मीन सय्यद,शबाना काझी,यास्मीन पंजेशा आदिसह पालक,विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)
Subscribe to get the latest posts sent to your email.