परंडा (माझं गाव माझं शहर ) दि २१ बदलापूर येथील बालिका वर झालेल्या अत्याचाराची घटना अत्यंत दुर्दैवी व संताप जनक आहे.महाराष्ट्र भूमी ही संतांची भूमी आहे अश्या भूमीत अशी घटना घडणे संस्कृतीला शोभत नाही,पीडित मुलींना न्याय मिळवून देऊन आरोपीला शिक्षा झाली पाहिजे, जर आरोपीला अटक करून शिक्षा झाली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महिला च्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र भर आंदोलन तीव्र. करण्यात येईल असा ईशारा देण्यात आला.
त्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार महिला जिल्हा सरचिटणीस सौं स्वाती हनुमंत गायकवाड, सौं उषा चंद्रसेन गटकुळ तालुका अध्यक्षा सौं दैवशाला सहदेव खैरे, नगरसेविका सौं रत्नामाला राहुल बनसोडे युवती तालुका कार्याध्यक्षा प्रियांका बाबुराव काळे,सौ .उज्वला वणवे , अल्पसंख्यांक प्रदेश सरचिटणीस नशिरशहा बर्फीवाले, सामाजिक न्याय विभाग जिल्हा अध्यक्ष राहुल बनसोडे, अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष गनी हावरे, ओ बी सी सेल चे तालुका अध्यक्ष नंदु शिंदे, शहर अध्यक्ष श्रीहरी नाईकवाडी, विधानसभा युवक तालुका अध्यक्ष हनुमंत गायकवाड,युवक शहर अध्यक्ष खयुम तुटके, , प्राचार्य हनुमंत यादव,शिक्षक सोसायटी सचिव पटेल सर,प्रा. शरद झोंबाडे, प्रा मारकड सर, प्रा. अजय मेटकर सर, प्रा. आटोळे सर, सहदेव खैरे,यांच्या सह शेकडो विध्यार्थीनी उपस्थित होत्या.
Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)
Subscribe to get the latest posts sent to your email.