परंडा (माझं गांव माझं शहर) दि ०६- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परिक्षेद्वारे पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घालत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार ) गटाचे परंडा विधानसभा अध्यक्ष नवनाथ जगताप यांच्यातर्फे सत्कार करण्यात आला.
सोनारी येथे तालुक्यातील देऊळगाव येथील विराज पाटील,भोंजा येथील सुदर्शन पाटील, परंडा शहरातील सोहन हजारे व पिठापुरी येथील राजकुमार नरुटे यांची पोलीस उपनिरिक्षकपदी निवड झाल्याबद्दल सोनारी ग्रामपंचायत येथ सत्कार करण्यात आला. ग्रामपंचायत ते श्री काळभैरवनाथ मंदिरापर्यंत हलकीच्या तालावर वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार ) गट परंडा विधानसभा अध्यक्ष नवनाथ जगताप व मंदिरातील पुजारी यांच्या वतीने चारही भूमिपुत्रांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना नूतन पोलीस उपनिरिक्षकपदी निवड झालेले विद्यार्थी म्हणाले, येणाऱ्या काळात तालुक्यातील नवीन शिक्षण घेणाऱ्या तरुणांना मार्गदर्शन करून जास्तीत जास्त पोलीस उपनिरिक्षक करण्याचा निर्धार आहे. यावेळी ग्रामस्थ, राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)
Subscribe to get the latest posts sent to your email.