अनाळा (माझं गाव माझं शहर) दि -३१ – परंडा तालुक्यातील अनाळा येथील जय जवान जय किसान शिक्षण संस्था संचलित न्यू हायस्कूल चे मुख्याध्यापक वसंत दत्तात्रय हिवरे यांचा सेवानिवृत्ती निमित्त सहपत्निक दि .३० रोजी भव्य सत्कार करून मान्यवरांच्या हस्ते निरोप देण्यात आला . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार राहुल मोटे , जि.प. चे माजी बांधकाम सभापती दादासाहेब पाटील सोनारीकर , रणजितसिह पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती . या कार्यक्रमात विविध मान्यवरानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक वसंत हिवरे यांनी शाळेसाठी केलेल्या योगदानाबद्दल कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या . तालुक्यात एक आदर्श मुख्याध्यापक म्हणून वसंत हिवरे यांची ओळख होती . शालेय सहकारी व त्यांच्यात मोठा समन्वय होता.त्यांच्या कालावधीत शाळेचा विद्यार्थी पट ही मोठया प्रमाणात वाढला होता . शाळेची गुणवत्ता ही मोठया प्रमाणात सुधारली होती . त्यांना निरोप देताना सर्व शिक्षक विद्यार्थी – विद्यार्थीनी यांना गहिवरून आले होते . कार्यक्रमास न्यू हायस्कुल शाळेचे संस्थापक सचिव लक्ष्मणराव वारे , शाळेचे अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय पाटील , माजी उपसरपंच नितीन शिंदे , उपसरपंच कल्याण शिंदे , जय हनुमान विद्यालयाचे माजी प्राचार्य नारायण भांडवलकर , सोसायटी चे चेअरमन दशरथ हिवरे , हभप महालिंग महाराज , हभप सतीश महाराज , जेष्ठ नागरिक हारीभाऊ हिवरे , विजयकुमार वानगोता परिसरातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक , शिक्षक , गावातील पालक , ग्रामस्थ सर्व शिक्षक विदयार्थी विद्यार्थीनी मोठया संख्येने उपस्थित होते . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सचिन पाटील यांनी केले तर आभार बाळासाहेब वरपे यांनी केले . कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे सर्व शिक्षक यांनी परिश्रम घेतले .
Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)
Subscribe to get the latest posts sent to your email.