परंडा(माझं गांव माझं शहर ) कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड तसेच परिसरातील छोट्या-छोट्या वस्ती व गजापूर गावात गरीब मुस्लीम कुटूंबावर व धार्मिक स्थळावर जातीयवादी संघटनाच्या कार्यकर्त्यांनी भ्याड हल्ला केला. या घटनेचा परांडा येथे निषेध करण्यात आला. यातील गुन्हेगारांवर कठोर करण्याची मागणी करण्यात आली.
या गावात जातीयवादी संघटनेच्या दहशतवादी गटाच्या लोकांनी एकत्र येऊन तेथील गरीब कुटूंबातील मुस्लीम समाजाच्या लोकांवर भ्याड हल्ला करुन तेथील मुस्लीम महिला, लहान मुले, वृध्द लोकांना अमानुषपणे मारहाण करुन त्यांची दुकाने, घरे, चार चाकी व दुचाकी वाहने यांची जाळपोळ केली आहे. तसेच अत्यंत चिड आणणारी घटना म्हणजे तेथील मुस्लीम समाजाच्या धार्मिक स्थळावर या लोकांनी कट करुन विशेष लक्ष करुन धार्मिक स्थळाची मोठ्या प्रमाणावर नासधूस करुन धार्मिक स्थळाचे पावित्र नष्ट केले आहे.
मुस्लीम समाज व त्यांच्या धार्मिक स्थळे यांना पुर्ण संरक्षण देण्यात यावे. अतिक्रमण हटाव मोहिम हातात घेवुन घटनेस जे-जे व्यक्ती जबाबदार आहेत त्यांच्यावर सुध्दा कठोर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी मुस्लिम बांधवांच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. यावेळी आरपीआय आठवले गट व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मुस्लिम बांधवांच्या या प्रकरणी पाठींबा देण्यात आला.
Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)
Subscribe to get the latest posts sent to your email.