परंडा, दि. ४- उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील एकूण सहा विधानसभा मतदारसंघांपैकी उध्दव ठाकरे यांच्या मशालीला सर्वाधिक समर्थन पालकमंत्री सावंत यांच्या भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघातून मिळाले आहे. सर्वात जहाल शब्दांत ठाकरेसेनेचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यावर पालकमंत्री सावंत यांनी प्रचार कालावधीत टीकेची झोड उठवली होती. लोकसभा मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार दोन लाखांच्या फरकाने निवडून येईल, असा दावाही पालकमंत्री सावंत यांनी केला होता. मात्र, त्यांना स्वतःच्या मतदारसंघातून देखील महायुतीच्या उमेदवार अर्चना राणाजगजितसिंह पाटील यांना मताधिक्य मिळवून देता आले नाही. माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील आणि राहुल मोटे या विरोधी नेत्यांनी सावंतांना चांगलेच घेरले आणि भूम परंडा- वाशी विधानसभा मतदारसंघातून ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना २३ व्या फेरीपर्यंत ६७ हजार ६४८ इतके मताधिक्य मिळवून दिले आहे.दरम्यान, संपूर्ण राज्याचे लक्ष असलेल्या उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत राजेनिंबाळकर यांनी महायुतीच्या उमेदवार अर्चना राणाजगजितसिंह पाटील सव्वा तीन लाखांच्या मताधिक्याने दारूण पराभव केल्याने परंड्यात महाविकास आघाडीच्यावतीने फटाके फोडून, गुलाल उधळून जोरदार घोषणाबाजी करीत जल्लोष करण्यात आला.

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीवरून राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या विरोधात संतापाची लाट होतीहे दिसून आले आहे. ओमराजे यांच्या विजयाचा परंड्यात महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी गुलालाची उधळण करीत मिठाई, पेढे वाटत जल्लोष करण्यात आला. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रणजित पाटील, शहरप्रमुख मुजावर, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाप्रमुख राहुल बनसोडे, मधुकर गायकवाड, सुभाष शिंदे, डॉ. अब्बास मुजावर, तय्यब मुजावर, इरफान शेख, रामलिंग गायकवाड आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)

Subscribe to get the latest posts sent to your email.

By माझं गांव माझं शहर(बातमीपत्र)

ग्रामीण शहरी भागातील नागरिकांचे जनजीवन व्यथा बातम्या राजकारणातील घडामोडी प्रसिद्ध करण्यासाठी माझ गाव माझे शहर या पेपरची स्थापना करण्यात आली

Leave a Reply

error: Only Reporters Login

Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading