परंडा(प्रतिनिधी)परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघातील भावी आमदार मनोज जरांगे-पाटील यांच्या भेटीला मनोज जरांगे – पाटील यांचा विधानसभेला फॅक्टर चालणार का ?
आमदार जोरदार तयारी करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील यांचा फॅक्टर चालल्याने मराठा समाजाचे भावी आमदार मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी अंतरवली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे पाटील यांचा सन्मान करून येत आहेत व त्यांचा सन्मान केलेला चा फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून आम्ही मराठा समाजाच्या पाठीमागे आहोत असे दाखवून देण्याचा केविलवाणी प्रयत्न होताना दिसून येत आहे. भूम परंडा वाशी या विधानसभा मतदार संघातील सर्वच भावी आमदार म्हणून जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांचा सन्मान करून आले आहेत निवडणुक लढविण्यासाठी अनेक भावी त्यांचे सन्मानाचे फोटो सोशल मीडियावर सध्या विधानसभेच्या निवडणुकीचे वातावरण जोरदार तापू लागल्याने मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी अंतरवली सराटी येथे भावी आमदारांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसून येत आहे व्हायरल फोटोवर मराठा मतदार समाजाकडून या सर्व भावी आमदारांना मनोज जरांगे पाटील आत्ताच दिसले का याच्या अगोदर आरक्षणाविषयी कोणतेही कधीही भाष्य का केले नाही असे मराठा समाजाकडून प्रश्न उपस्थित केला जात आहे आरक्षणाविषयी कोणी बोलायला तयार नाही मात्र निवडणूक लागली की सर्व सध्याचे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे यांना आताच दिसू लागले आहेत असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर मराठा समाजाकडून जे मनोज जरांगे पाटील उमेदवार देतील त्यांनाच मराठा समाज मतदान करेल. जर उमेदवार नाही दिला तर मनोज जरांगे ज्यांना सांगतील त्यांनाच मतदार करणार असल्याचे मराठा समाजातून बोलले जात आहे. त्यामुळे या विधानसभेला मनोज जरांगे पाटील यांचा फॅक्टर कोणाला चालणार असेही चर्चा होताना ऐकायला मिळू लागली आहे.


Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)

Subscribe to get the latest posts sent to your email.

By माझं गांव माझं शहर(बातमीपत्र)

ग्रामीण शहरी भागातील नागरिकांचे जनजीवन व्यथा बातम्या राजकारणातील घडामोडी प्रसिद्ध करण्यासाठी माझ गाव माझे शहर या पेपरची स्थापना करण्यात आली

Leave a Reply

error: Only Reporters Login

Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading