किसान मोर्चा शेतकऱ्यांची बांधिलकी जपण्यासाठी काम करणार – रंगनाथ सोळंके
धाराशिव दि 23 भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा शेतकरी कष्टकरी गोरगरीब अशा सगळ्यांची बांधिलकी जोपासण्यासाठी काम करणार असल्याचे मत भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस रंगनाथ सोळंके यांनी व्यक्त केले आज शनिवारी दि 23 रोजी शहरातील भाजपा भवन येथे धाराशिव जिल्हा भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते श्री सोळंके पुढे बोलताना म्हणाले की, किसान मोर्चाच्या माध्यमातून आपल्याला जिल्ह्यात संघटना बळकट करून सर्वसामान्य शेतकऱ्यांना आधार आपुलकी वाटेल त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने काम करत असून त्यांना शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणे गरजेचे आहे केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवून शेतकऱ्यांचे जीवनात चांगले दिवस आणण्यासाठी पंतप्रधान प्रयत्न करत असल्याचे शेवटी सोळंके यांनी सांगितले यावेळी जिल्ह्यातील नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले त्याचबरोबर वाशी तालुक्यात 38 गावात ग्राम परिक्रमा कार्यक्रम केली आहे.
Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)
Subscribe to get the latest posts sent to your email.