संपादकीय | परंडा(माझं गांव माझं शहर) 04-08-2024 तालुक्याला ऐतिहासिक व धार्मिक स्थळांचा वारसा लाभलेला आहे. शहरातील ऐतिहासिक भुईकोट किल्ला, डोमगाव येथील सर्व बाजुंनी पाण्याने वेढलेले श्री कल्याणस्वामींच्या समाधी मंदिरात महाराष्ट्रासह परराज्यातूनही भाविक व पर्यटक मोठ्या संख्येने येतात.
परंतु सध्या संबंधित ठिकाणी व जवळच्या परिसरात भाविक व पर्यटकांसाठी सुविधांची कमतरता आहे. सुविधा उपलब्ध झाल्यास युवकांना रोजगाराची संधी मिळून आर्थिक उलाढाल वाढण्यास मदत होऊ शकते. तालुक्यातील सीना-कोळेगाव प्रकल्प, डोमगाव येथील श्री कल्याणस्वामींची समाधी असलेले श्रीराम मंदिर, शहरातील श्री हंसराज स्वामी, प्रज्ञानंद स्वामी व अनंतदास स्वामी यांची समाधी असलेला मठ, श्रीक्षेत्र सोनारी येथील श्रीकाळ भैरवनाथ जोगेश्वरी मंदिर, सुफी संत हजरत ख्वॉजा बद्रोद्दीन चिश्ती यांचा दर्गाह तसेच आवाटी येथील वली बाबा दर्गाह आदी ठिकाणी देशभरातून भाविक भक्त व पर्यटक दर्शन व पर्यटनासाठी येतात.
परंडा शहरात हंसराज स्वामी, प्रज्ञानंद स्वामी व अनंतदास स्वामी यांची समाधी असलेला मठ आहे. भाविक व शिष्यगण पुण्यतिथी उत्सवास मोठ्या संख्येने येतात. ग्रामदैवत सुफी संत हजरत खाँजा चंद्रोद्दीन यांचा दर्गाह आहे. येथे दरवर्षी उरुसास हिंदू-मुस्लिम समाजबांधव येतात. शहरापासून १० किलोमीटरवरील आवाटी येथे वली बाबा यांचा दर्गाह आहे. येथे पुणे, मुंबई, हैदराबाद, कोल्हापूर, सोलापूर आदी भागातून लोक दर्शनासाठी येतात.राहणे, जेवणासाठी हॉटेलिंग सुविधेअभावी धावती भेट
परंडा शहरातील ऐतिहासिक भुईकोट किल्ला. २ परंडा तालुक्यातील डोमगाव येथील श्रीराम मंदिर. परिसरात हवी हॉटेलिंगची सुविधा पर्यटकांना राहण्याची व भोजनासाठी हॉटेलिंगची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे धावती भेट देऊन परततात. पर्यटकांना पाहण्यासाठी व पर्यटनासाठी तालुक्यात विविध ठिकाणे आहेत. त्यामुळे परंडा तालुका पर्यटकांसाठी महाराष्ट्रात अग्रेसर
पाण्याने वेढलेले श्रीराम मंदिर होण्यासाठी लोकप्रतिनिधींनी तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यासह पर्यटन स्थळांसाठी विकास निधी आणणे आवश्यक आहे. तालुक्यातील ऐतिहासिक व धार्मिक स्थळांचा हवा तसा विकास झालेला नाही. त्यामुळे राज्याबाहेरुन आलेले भाविक व पर्यटकांना थांबण्यासाठी आवश्यक सुविधा धार्मिक व पर्यटन स्थळांच्या ठिकाणी उपलब्ध नाही. अनेक पर्यटक व भाविक धावती भेट देतात.
सोनारीत चैत्रात रथोत्सव
श्रीक्षेत्र सोनारी येथे श्रीकाळ भैरवनाथ जोगेश्वरी मंदिर आहे. येथे चैत्र महिन्यात मोठा रथोत्सव व यात्रा भरते. यावेळी राज्यासह परराज्यातील लाखो भाविक दर्शनासाठी येतात. तसेच राजकीय मंडळीचे कुलदैवत असल्याने अनेक मंत्री, आमदार, खासदार दर्शनासाठी येतात. परंतु अपेक्षित विकास झाला नसल्यानेभाविकांचा अपेक्षाभंग होतो. परिसरात रोजगाराची संधी उपलब्धतेसाठी भक्तांसाठी सोयी-सुविधा उभारणे आवश्यक आहे.

डोमगाव येथे चोहोबाजूंनी पाण्याने वेढलेले श्रीराम मंदिर आहे. येथे समर्थ रामदास स्वामी यांचे शिष्य श्री कल्याणस्वामी यांची वाळूची समाधी आहे. दासबोधाची मूळात या ठिकाणी पहावयास मिळते. सीना-कोळेगाव प्रकल्पात पाणीसाठा झाल्यानंतर पर्यटकांना पाण्यात बोटिंगची सुविधा केल्यास पर्यटनात वाढ होऊ शकते. यामुळे हॉटेल व इतर व्यवसायाला चालना मिळू शकते. प्रकल्प पाहण्यासाठी शैक्षणिक सहली येत आहेत. परंतु सोयी-सुविधाचा अभाव व रस्त्याची दुरावस्था झाल्याने त्यांना अडचणी येत आहेत. ४.४० कोटीतून किल्ला संवर्धनाचे काम येथील ऐतिहासिक ठेवा असलेल्या भुईकोट किल्ल्याच्या संवर्धनासाठी पाच वर्षांपूर्वी माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या पाठपुराव्यामुळे पुरातत्व विभागाकडून ४ कोटी ४० लाख रुपयांचा निधी मिळाल्याने पूर्वीचा बाज कायम ठेवत बांधकाम व डागडुजीचे काम करण्यात आले. पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या माध्यमातून किल्ल्यातील अनावश्यक झाडी व खंदकाचे खोलीकरण करण्यात आले. त्यामुळे किल्ला पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची गर्दी वाढत आहे. किल्ल्याची तटबंदी भक्कम आहे. २६ बुरुज असून त्यावर पंचधातू व इतर धातूंच्या लहान-मोठ्या ६३ कलाकुसर केलेल्या तोफा आहेत. पावसामुळे सर्वत्र हिरवळ पसरली आहे. परंतु बुरुजावर अनावश्यक झाडी वाढल्याने धोका निर्माण झाला आहे.


Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)

Subscribe to get the latest posts sent to your email.

By माझं गांव माझं शहर(बातमीपत्र)

ग्रामीण शहरी भागातील नागरिकांचे जनजीवन व्यथा बातम्या राजकारणातील घडामोडी प्रसिद्ध करण्यासाठी माझ गाव माझे शहर या पेपरची स्थापना करण्यात आली

Leave a Reply

error: Only Reporters Login

Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading