परंडा, ता. ७ (माझं गांव माझं शहर ): गणरायाचे ढोल ताशा, हलगीचा कडकडाटात पारंपारिक वाद्यांच्या गजरात, गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करीत चैतन्यपूर्ण वातावरणात घरोघरी, गणेश मंडळांत आगमन झाले. आठवडा बाजार मैदानावर विक्रीसाठी स्टॉल, दुकाने थाटण्यात आली आहेत. सजवण्यात आलेल्या या स्टॉलवर मूर्ती खरेदीसाठी गणेशभक्तांनी सकाळपासूनच मोठी गर्दी केली होती. सार्वजनिक गणेशमूर्ती, घरगुती गणेशमूर्ती आणण्यासाठी शहारातील व ग्रामीण भागातील गणेशभक्तांनी सहकुंटुब, बच्चे कंपनीने स्टॉलवर मोठी गर्दी केली होती. विविध कलाकुसरीच्या, रंगसंगतीच्या लहान-मोठ्या आकर्षक गणेशमूर्ती विक्रीसाठी आणल्या होत्या. मागील काही महिन्यांपासून कारागिरांनी अथक परिश्रमातून लहान मोठ्या आकर्षक रंगसंगती करुन गणेशमूर्ती विक्रीस आणल्या होत्या. मूर्ती तयार करण्यासाठी कच्च्या मालाची अर्थिक जुळवाजुळव करीत यावर्षी मूर्तीमध्ये
अधिक विविधता आणण्याचे काम केले. गणेश भक्तांनी लहान-मोठ्या मूर्ती खरेदी केल्या असल्याचे मूर्तीकार लहू कुंभार यांनी सांगितले. मागील दोन दिवसांपासून गणेशाच्या छोटेखानी मंडपासह आरास, लाईटमाळा सजावटीसाठी बाळगोपाळ, शालेय मुलांसह तरुणाईची मोठी लगबग सुरु होती. शहरातील मानाचा एकमेव ट्रस्टी जय भवानी गणेश मंडळासह, बालवीर गणेश, शिवछत्रपती गणेश, जय हनुमान, टेंबे गणेश, हंसराज गणेश, विठ्ठल गणेश, नरवीर गणेश, जय मल्हार गणेश, कमांडो करिअर अॅकडमी, क्रांती अॅकॅडमी आदी गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांची सकाळपासून प्रतिष्ठापना करण्यासाठी मोठी धावपळ सुरु होती. शहरातील व ग्रामीण भागातील सार्वजनिक गणेश प्रतिष्ठापनेला आलेल्या ऑनलाईन अर्जानुसार शहरातील १२ व ग्रामीण ३० एकूण ४२ गणेश मंडळांना परवानगी दिली आहे. अजून काही मंडळांना परवानगी देण्याचे काम सुरुच असल्याचे पोलिस नाईक नितीन गुंडाळे यांनी सांगितले. पोलिस व गृहरक्षक दलाचा बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याचे पोलिस निरिक्षक विनोद इज्जपवार यांनी सांगितले.


Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)

Subscribe to get the latest posts sent to your email.

By माझं गांव माझं शहर(बातमीपत्र)

ग्रामीण शहरी भागातील नागरिकांचे जनजीवन व्यथा बातम्या राजकारणातील घडामोडी प्रसिद्ध करण्यासाठी माझ गाव माझे शहर या पेपरची स्थापना करण्यात आली

Leave a Reply

error: Only Reporters Login

Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading