धाराशिव दि.२१ (प्रतिनिधी) – राहत्या घराला लागून एरटेलचे टॉवर उभा करण्यात येत आहे. त्यामुळे कच्या घरातील कुंटुंबाच्या जिवीतास धोका होत असल्याने एरटेल टॉवरचे काम थांबवून चौकशी करुन न्याय देण्यात यावा. अन्यथा तहसील कार्यालयासमोर कुटुंबासह आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा संबंधितांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.

दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, वाशी तालुक्यातील पिंपळगाव लिंगी येथील रत्नदीप ज्ञानोबा गाडे व आनंद किसन गाडे यांच्या राहत्या घराला लागून एरटेलचे टॉवर उभा करत असल्यामुळे कच्या घरातील कुंटुंबांच्या जिवीतास धोका होत आहे. विशेष म्हणजे गाडे हे अनुसुचीत जातीचे असून अपंग आहेत. तर त्यांची परिस्थिती नाजूक असून त्यांची कच्ची घरे आहेत. तसेच त्यांच्या शेजारील शेतकरी बालाजी विश्वंभर बोरकर यांचा गट नं ५७५ असून गाडे यांच्या घरापासून १० फूट गावठाण आहे. तरी देखील त्या शेतकऱ्याने गाडे यांच्या भिंतीला लागून एरटेलच्या टॉवरचे काम सुरु केलेले आहे. त्यामुळे गाडे यांच्या दगड मातीच्या घराला जमीनदोस्त होण्याची वेळ येईल. या ठिकाणी टॉवर उभा करु नका म्हणून विनंती केली. परंतू ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत, उलट काय करायचे ते करा ? अशी धमकी देतात. ते एरटेल टॉवरचे काम बंद न केल्यास वाशी तहसील कार्यालयासमोर सहकुंटुंब आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे.


Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

error: Only Reporters Login

Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading