——“”आठवणीतील तात्या “”—
My Village My City NEWS (04) साधारण १९८५चेआसपासचा काळ, महाराष्ट्रात तत्पूर्वी हिंदूरूदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची मुंबईत मराठी माणसांचे लोप पावत चाललेले अस्तित्व टिकविण्यासाठी हिंदूत्ववादी जहाल शिवसेना संघटना मजबूत होवून अख्ख्या महाराष्ट्र भर नावारूपास आलेली, त्याच कालावधीत दलितांवरील अन्याय अत्याचारांचा मुकाबला करणेसाठी पद्मश्री नामदेव ढसाळ, ज. वि. पवार ईत्यादीनी भारतीय दलीत पॅन्थर ही लढाऊ व आक्रमक संघटना स्थापन केलेली, त्याकाळी पॅन्थर रामदासजी आठवले साहेबांचा आक्रमक चेहरा , व बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेनेचे माध्यमातून जहाल हिंदूत्ववादी चेहरा पूर्ण महाराष्ट्रातील जनतेला आकर्षीत करून घेऊ लागला, तोपर्यंत परंड्याचे भूमीत कुठल्याही जातीधर्माची संघटना नव्हती, परंडा शहरात नविनच उमदी तरणाबांड पिढी उदयास येत होती त्यांना ईतर गावा प्रमाणे आपल्याही गावात शाखा काढण्याचा मोह आवरला नाही, आणी त्यातूनच साधारण १९८५सालीपरंड्यात शिवसेनेची शाखा सुरू होऊन त्याचे तालुका अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर पाटील (तात्या) यांचेकडे आले व तितक्याच आक्रमक पणे संघटना चळवळीचे काम जोमाने करून तालुक्यास धाडसी नेतृत्वाची ओळख झाली, त्याच धर्तीवर भारतीय दलित पॅन्थर या आक्रमक संघटनेची ही परंडा शहरात स्थापना होऊन त्याचे नेतृत्व श्री संजय कुमार बनसोडे यांचेकडे आले ते ही त्यांचे कार्यामुळे तालुक्यातील पूर्ण दलीत, पिडीत, भटके मागास समाजात प्रसिध्दीस आले, त्याच कालावधीत आरएसएस चे माध्यमातून श्री सुजीतसींहजी ठाकूर साहेब यांचेही नेतृत्व उदयास आले, तीनही रांगडे युवक आपआपल्या संघटनेत कामाचे जोरावर आपआपल्या समाजात प्रसिद्ध झाले व त्यांचा जनमानसात प्रभाव वाढू लागला,त्याच कालावधीत सन १९९०साली परंडा नगरपरीषदेवर तिघेही नगरसेवक झाले, त्यावेळेला श्री सुभाषसींहजी सद्दीवाल हे नगराध्यक्ष होऊन सुजीतसींहजी ठाकूर साहेब व संजय बनसोडे यांनी श्री सुभाषसींहजी सद्दीवाल यांचे नेतृत्व स्विकारले तर तात्या हे कट्टर विरोधक म्हणून नगरपरीषदेवर काम करू लागले, त्यांची आपआपल्या जनमानसावरील पक्कड मजबूत राहिली, त्यावेळी तत्कालीन आमदार श्री महारुद्र बप्पा मोटे हे होते, बप्पांंचे कार्यकर्ते ही दुसरे टर्म पर्यंत एक दिलाने काम करत होते, सन १९९०साली बप्पा तिसरे वेळी आमदार निवडणुकीत उभे राहिले व शिवसेनेकडून श्री ज्ञानेश्वर पाटील (तात्या) यांना उमेदवारी जाहीर झाली, आणि त्याच वेळी राजकीय डावपेचांची चुणूक दाखवत नगरपरीषद सभागृहातील सहकारी, व पॅन्थर चळवळीचे नेतृत्व संजय बनसोडे यांचा समाजावर असलेला प्रभाव पाहता, विधानसभा निवडणुकीस ऊभे राहण्यास प्रोत्साहित करून, तात्यांनी राजकीयदृष्ट्या डावपेचांची सुरवात केली, त्यावेळी बप्पांंचेही काही कार्यकर्ते यांनी माझी समक्ष भेट घेऊन संजय बनसोडे (बापू)चा उमेदवारी अर्ज माघार घेण्यासाठी मला गळ घातली म्हणून मी बापूराव ला उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी शोधत असताना तात्यांना माहीती झाल्याबरोबर मला तात्यांनी गाठले व व बापूराव चा उमेदवारी अर्ज न काढण्यासाठी गळ घातली,वतात्या आमदार होणार हे खात्रीने सांगितले,बप्पांचे कार्यकर्ते हीसैरभैर झाले, बापूराव नेही जोमाने प्रचार सुरू केला, संजयबापूला समाजाचा मिळणारा प्रतिसाद पाहता त्या वेळचे जिल्ह्याचे नेते मंत्री डॉ पद्मसींहजी पाटील साहेब यांचे मार्गदर्शन नुसार संजयबापूला मोटेबप्पांना पाठींबा देण्यास भाग पाडले, संजयबापूचे तत्कालीन निष्ठावान कार्यकर्ते तानाजी बप्पा बनसोडे, मचींदर दुबळे सोनारी,सुग्रीव चव्हाण डोंजा वईतर असंख्य चलबिचल होऊन मतांची विभागणी झाली,श्री सुजीतसींहजी ठाकूर साहेब तर भाजपचे असल्याने शिवसेना भाजपची युतीच होती त्यामुळे तात्यांना आमदार करण्यासाठी त्यांनी रात्र, दिवस जिवापाड मेहनत घेतली, आणी त्याचाच फायदा तात्यांना होऊन तात्या एकदम तरूण वयात आमदार झाले, म्हणजेच नगरपरिषदेच्या सभागृहातील नगरसेवक सहकारी सुजीतसींहजी ठाकूर साहेब यांचे सह संजयबापू बनसोडे यांचाही तात्यांना आमदार होण्यास फायदा झाला,,,,
आजपर्यंत हे तिनही आपआपल्या पक्षात उच्च पदावर पोंचले असून सुजीतसींहजी ठाकूर साहेब पण विधानपरिषदेचे आमदार झाले, ठाकूर साहेब व संजयबापू हे वर्गमित्र असून, ते सर्व समवयस्कच आहेत व आजपर्यंत त्यांनी मित्रत्व हसत खेळत गावचे अडीअडचणी बाबतीत एक विचाराने कायम टिकवले, त्यांच्याच पिढीतील आदरणीय माजी आमदार श्री ज्ञानेश्वर तात्या पाटील यांचे निधन, ही परंडा शहरातील सर्वच समाजाचे नागरिकासाठी खूपच दुख्खदायक घटना, कारण तात्यांनी परंडा शहरात कधीही पक्षीय राजकारण न करता पूर्ण शहराचे एक पालकत्वाची जबाबदारीच निभावली,,,,
तात्यांचे आकस्मिक निधनातून सावरण्यासाठी पाटीलपरीवारास परमेश्वराने बळ द्यावे, तात्यांचे आत्म्यास शांती मीळो, हीच आम्हा बनसोडे परिवाराकडून परमेश्वरास विनंम्र पुर्वक विनंती व तात्यांना भावपूर्ण श्रध्दांजली,,,,,
विजयकुमार दादा बनसोडे,
-संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती परंडा
Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)
Subscribe to get the latest posts sent to your email.