परंडा,ता.२ (प्रतिनिधी ) शहरातील आत्मसूर्य महिला बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने शालेय मुलामुलींचे भावविश्वाला आकार मिळावा,विद्यार्थ्यांची सर्वांगिण जडणघडण होवुन सकारात्मक व्यक्तिमत्व घडावे यासाठी संचालक शिक्षिका मिनाक्षी नकाते यांच्या पुढाकारातुन शहरातील लाल मारुती चौकात रविवार ता.१ रोजी ” हॅप्पी क्लब ” शुभारंभ करण्यात आला.
हल्ली घरोघरी एकच ऐकायला मिळते की , मुले बिघडली आहेत,आमचे काही ऐकतच नाहीत, स्वच्छंदी, विलासी, आळसी, हट्टी बनली आहेत. गप्प गप्प राहतात त्यांना आपल्या कर्तव्याची जाणीव नाही,अतीलाडाने ती पार बिघडून गेली आहेत. छोट्या छोट्या गोष्टीचा चटकन राग येतो. या सर्व बाबींची कारणमिमांसा पाहता त्यावरील उपाय शोधण्याच एक माध्यम म्हणजे हॅप्पी क्लब आहे.
या क्लबच्या माध्यमातून मुलांना मानसिकदृष्ट्या सक्षम करणे. त्यांच्या मध्ये सकारात्मकता वृद्धिंगत करणे, मनातील भावनांना व्यक्त करण्यासाठी हे व्यासपीठ त्यांना नक्कीच मदत करेल असे मत नकाते यांनी बोलताना व्यक्त केले.शालेय मुलांमुलींचा स्क्रीन टाईम वाढलेला आहे. त्यामुळे विविध विकार मुलांना जडताना दिसतात, एकलकोंडी होणे, ताणतणावातुन नैराश्य येणे, या नैराश्यातून चुकीचे पाऊल उचलले जाते. गरज आहे व्यक्त होण्याची, त्यासाठी अशा शालेय मुलानां व्यक्त होण्यासाठी हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी बौध्दीक,सुप्त गुणांना वाव देण्यासाठी हॅप्पी क्लब ची स्थापना करण्यात आली आहे. या क्लबच्या माध्यमातुन अभ्यासाची गोडी निर्माण होवुन स्पर्धा परीक्षांची प्रेरणा मिळावी याकरिता जिल्हा परिषद शाळेत शिकलेले व मराठी अधिकाऱ्यांचं गाव म्हणून सर्वदुर परिचीत आसलेल्या माढा तालुक्यातील उपळाई बुद्रुक या गावातील उच्चपदस्थ, यशस्वी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन व प्रत्यक्ष भेट या गोष्टी मुलांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच क्षेत्रभेट,शैक्षणिक सहल,गीतगायन,वक्तुत्वकला, चिञकला यातून मुलांचे मनोरंजनासह आनंद निर्माण करणारे सकारात्मक बदल होण्यास मदत होणार आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून हॅप्पी क्लब हा सर्वांसाठी मोफत चालविला जाणार असल्याचे नकाते यांनी सांगितले. यावेळी जेष्ठ महिला निर्मला विटकर, वृक्ष संवर्धन समितीचे तालुकाध्यक्ष मुख्याध्यापक बाळासाहेब घोगरे , सुजित देशमुख , उपक्रमशील शिक्षक महेश शिंदे , व्हाईस आॕफ मिडिया जिल्हाउपाध्यक्ष प्रकाश काशीद, मुख्याध्यापक गणेश विटकर, मुख्याध्यापक सुरेखा भोसले,शिक्षिका अर्चना कोकाटे आदिसह पालकांची उपस्थिती होती. मंजुषा फडके यांनी आभार व्यक्त केले.
Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)
Subscribe to get the latest posts sent to your email.