देवगांव (बु ) प्रतिनिधी दि. 05(माझं गांव माझं शहर)
परंडा तालुक्यातील मौजे देवगांव (बु ) येथील ग्रामदैवत हनुमान मंदिराचा पायाभरणी सोहळा श्रावण मासारंभाच्या शुभ मुहूर्तावर सन्मानीय श्री. गोरक्ष खरड (सा. पो. निरीक्षक अंभी पोलीस स्टेशन ) यांच्या शुभहस्ते ग्रामस्थांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. भारतीय संस्कृतीची परंपरा जोपासताना आपले ध्येय साध्य करण्यासाठी आपली मानसिकता चांगली राहण्यासाठी आपण आपल्या दैनंदिन जीवनात श्रद्धास्थान निश्चित करून कर्तव्यतत्परता,चांगली नीतिमत्ता, सदविचार, सद्गुण अंगी बाळगून वाटचाल केल्यास सुखी जीवनाचा मार्ग सापडल्याशिवाय राहणार नाही व त्याद्वारे मानवी जीवनाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन सा. पो. निरीक्षक गोरक्ष खरड साहेब यांनी या प्रसंगी आपले विचार व्यक्त करताना केले.गावच्या विकासकामासाठी गावात शांतता व सुव्यवस्था टिकवण्यासाठी आपण सर्वं ग्रामस्थ प्रयत्नशील राहिल्यास अशा सहकार्यासाठी मी सदैव आपल्या खंबीरपणे पाठीशी उभा राहिल अशी ग्वाही त्यांनी ग्रामस्थांना दिली. गावचे पोलीस पाटील प्रकाश शिंदे यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सी. सी टीव्ही कॅमेरे बसवण्याची संकल्पना मांडली या बाबीची नितांत गरज असल्याचे साहेबांनी नमूद करून लोकवर्गणीतून त्याची पूर्तता करावी असे ग्रामस्थांना सूचित केले.खरड साहेबांसारखे उच्च विचारसरणी व कर्तव्यदक्ष अधिकारी देशाला लाभले तर आपल्या देशाची नक्कीच उन्नती झाल्याशिवाय राहणार नाही असे ग्रामस्थांच्या वतीने कार्यक्रम समारोप प्रसंगी विक्रमसिंह राजेभोसले (मा. प्राचार्य ) यांनी आपले मत व्यक्त केले. यावेळी काळेवाड साहेब (बीट अंमलदार पो. स्टेशन अंभी )लक्ष्मण मुसळे,बाबासाहेब राजेभोसले,कृष्णराव राजेभोसले,पांडुरंग पवार, छगन सरकाळे, अंगद मुसळे, बापू मुसळे, पोपट घाडगे,काका पवार, दत्तात्रय ठाकरे,तानाजी सरकाळे, रेवन आरे, धनंजय राजेभोसले,बाजीराव शिंदे,दादा ठाकरे,नवनाथ राऊत, नवनाथ शिंदे,गणेश कदम, संतोष लवंगारे,व गावातील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)

Subscribe to get the latest posts sent to your email.

By माझं गांव माझं शहर(बातमीपत्र)

ग्रामीण शहरी भागातील नागरिकांचे जनजीवन व्यथा बातम्या राजकारणातील घडामोडी प्रसिद्ध करण्यासाठी माझ गाव माझे शहर या पेपरची स्थापना करण्यात आली

Leave a Reply

error: Only Reporters Login

Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading