परंडा पोलीस स्टेशन येथे दिव्यांग कलमाची प्रभावी अंमलबजावणी.
परंडा प्रतिनिधी( 28) परंडा येथे दिव्यांग कायदा 2016 नुसार कलम 92 अ व ब नुसार कारवाई करून दिव्यांगांना न्याय दिल्याबद्दल दिव्यांग समूहाच्या वतीने परांडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार , बीट आमदार मुळे यांचा दिव्यांग उद्योग समूहाच्या वतीने सन्मान करण्यात आला मौजे कौडगांव येथील दिव्यांग यांच्यावर दि 22 मार्च रोजी झालेल्या मारहाणी संदर्भात कलम 92 अ व ब लावून दिव्यांगांना न्याय देऊन संबंधित आरोपीस अटक झाली व दिव्यांगांना योग्य न्याय मिळाला व न्याय मिळवून देण्यासाठी परांडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद इज्ज पवार एपीआय कविता मुसळे ,व कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले त्याबद्दल दिव्यांग उद्योग समूहाच्या वतीने परंडा येथील पोलीस स्टेशनमध्ये सत्कार करण्यात आला दिव्यांगाना आपण असे सहकार्य करावे व वेळोवेळी दिव्यांगावर होणारे अत्याचारासंबंधी मार्गदर्शन केले जाईल आम्ही नेहमी आपणाला सहकार्य करेल असे मत पोलीस निरीक्षक यांनी व्यक्त केले यावेळी दिव्यांग उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष तानाजी घोडके शहराध्यक्ष गोरख देशमाने , सतीश पवार भाजपा सरचिटणीस महादेव बारस्कर पवन नितीन शिंदे दादा माने फुलचंद माने आधी सह दिव्यांग बांधव उपस्थित होते
Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)
Subscribe to get the latest posts sent to your email.