अनाळा , प्रतिनिधी – परंडा तालुक्यातील अनाळा येथील जि . प . शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी रेवननाथ शिंदे यांची तर उपाध्यक्षपदी लक्ष्मण शिंदे यांची सर्वानुमते दि .१६ रोजी निवड करण्यात आली . १३ सदस्य संख्या असलेल्या शालेय व्यवस्थापन समिती मधून दोघांची अध्यक्ष – उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली . दि . १६ रोजी जि .प . शाळेत शालेय व्यवस्थापन समिती बैठक मुख्याध्यापक गौतम रणपिसे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली . या समिती मध्ये जावेद शेख , उषा क्षिरसागर , स्वाती चव्हाण , शिवाजी जाधव , अनिता काटकर , शुभागी शिंदे , कविता सरवदे , कमलेश गोडसे , लक्ष्मण मुकटे , बाजीराव रणदिवे , कानिफनाथ फराटे , आदिचा सामावेश आहे . निवडी नंतर अध्यक्ष – उपाध्यक्ष यांचा सत्कार सरपंच जोतीराम क्षिरसागर , माजी उपसरपंच दादासाहेब फराटे , भाजपा सोशल मिडीया तालुका अध्यक्ष निशिकांत क्षिरसागर , भाजपा युवा नेते भाऊसाहेब पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला . यावेळी ग्रा.प. सदस्य चांगदेव चव्हाण , अजित शिंदे , विनोद कदम , अशोक शिदे , ओंकार शिदे , चतुर्भुज शिंदे , बालाजी शिदे , अंबादास क्षिरसागर , बाजीराव पवणे , रविद्र रिटे यांच्या सह शिक्षक ए. एस . तांदळे , पी . पी . साबळे एम . बी . केमदारणे , शिक्षिका – के एस . येळवे , एस . एस . पाटील , एस .टी . पालके , एम . ए . राऊत यांच्यासह विदयार्थी उपस्थित होते .
Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)
Subscribe to get the latest posts sent to your email.