परंडा प्रतिनिधी(4 जुलै 2024) दिव्यांग उद्योग समूहाच्या पाठपुराव्यातून मौजे देऊळगाव तालुका परांडा येथील दिव्यांग बांधवांना केंद्र शासनाच्या एडीआयपी योजनेतून ADIP ( आमदार राणा दादा पाटील व खासदार ओमराजे निंबाळकर) यांच्या संयुक्त वतीने व जिल्हाप्रमुख तानाजी घोडके यांच्या विनंतीनुसार दिव्यांग व्यक्तींना विविध जीवन उपयोगी साहित्याचे वाटप केले यामध्ये चार सायकली , एलबोस्टिक काट्या वाटप करण्यात आल्या यावेळी देऊळगाव ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य व ग्रामविकास अधिकारी वैभव भांडवलकर यांनी उत्कृष्ट नियोजन करून दिव्यांग उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष तानाजी घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली हे साहित्य वाटप करण्यात आले . शासनाच्या विविध योजनांमध्ये दिव्यांग व्यक्तीने सक्रिय होऊन आपल्या दिव्यांगाचा हक्क मिळवावा व दिव्यांगाने जीवनामध्ये उत्तम जीवन जगावे ‘एकच ध्यास दिव्यागाचा उद्धार हाच दिव्याग उद्योग समूहाचा आधार.’ यामध्ये दिव्यांग लाभार्थी शैला बदर लाला अर्जुन गाढवे भाऊ भोसले भरत गाढवे आधी दिव्यांग व नागरिक उपस्थित होते.
Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)
Subscribe to get the latest posts sent to your email.