परंडा,ता.६ (माझं गांव माझं शहर )सोशल मीडियाच्या तंञज्ञानाच्या युगातही वर्तमान पञात छापुन येणाऱ्या बातमीवर वाचकांची विश्वासार्हता आजही टिकुन आहे. राज्यकर्त्यांना झुकवण्याची व समाज घडवण्याची ताकद पत्रकारांच्या लेखणीत आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पत्रकारांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पञकारिता करावी.व्हाईस आॕफ मीडिया घेत असलेले विविध सामाजीक उपक्रम स्तुत्य आहेत. असे मत भाजपा नेते, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी व्यक्त केले.
येथील पंचायत समिती सभागृहात सोमवार ता.६ रोजी व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या वतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करुन “पञकार दिन ” साजरा करण्यात आला. यावेळी भाजपा नेते, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर,प्रभारी तहसीलदार पांडुरंग माढेकर,पोलीस निरिक्षक विनोद इज्जपवार,तालुका कृषी अधिकारी नानासाहेब लांडगे,पं.स.प्रशासन अधिकारी बाबु पवार,माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर, उद्योजक काकासाहेब साळुंके,जलजीवनचे जिल्हा समन्वयक अनिल राऊत,जेष्ठ विचारवंत शहाजी मोरे आदि मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती, यावेळी प्रभारी तहसीलदार माढेकर म्हणाले की विविध सोशल मीडिया माध्यमाची धुम असतानाही प्रिंट मीडियाचे महत्व कायम आहे.आजही वर्तमानपञातुन येणाऱ्या बातम्यांवर वाचकांची विश्वासार्हता आहे.पञकारांनी सामाजीक बांधिलकीतुन वार्तांकन करुन सर्वसामान्यांच्या प्रश्नांची न्यायभुमिका बजवावी.याप्रसंगी पोलीस निरिक्षक विनोद इज्जपवार,तालुका कृषी अधिकारी नानासाहेब लांडगे यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने पञकारिता क्षेञात उल्लेखनीय योगदानाबद्दल जेष्ठ पञकार श्रीराम विद्वत,रतिलाल शहा,मुजीब काझी यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव सन्मान करण्यात आला.व्हाईस आॕफ मीडियाच्यावतीने पदाधिकारी व सदस्यांचा मान्यवरांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रकाश काशीद यांनी तर सूत्रसंचालन तानाजी घोडके यांनी केले.आभार आप्पासाहेब शिंदे यांनी केले. या कार्यक्रमासाठी व्हाईस आॕफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश काशीद, मराठवाडा उपाध्यक्ष आप्पासाहेब शिंदे, तालुकाध्यक्ष प्रमोद वेदपाठक,ता.कार्याध्यक्ष मुजिब काझी,अलिम शेख, तानाजी घोडके, रवींद्र तांबे, संतोष शिंदे श्रीराम विद्वत,विजय मेहेर, साजिद शेख, राहुल शिंदे, फारूक शेख, रतिलाल शहा,उत्तरेश्वर शिंदे,पांडुरंग ठोसर,रावसाहेब काळे,समीर ओव्हाळ,नाना केसकर,अर्जुन गोडगे,गोरख देशमाने आदिंनी पुढाकार घेतला.कार्यक्रमासाठी विविध क्षेञातील मान्यवर,प्रतिष्ठीत नागरीक,सरपंच,महिला उपस्थित होते.


Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)

Subscribe to get the latest posts sent to your email.

By माझं गांव माझं शहर(बातमीपत्र)

ग्रामीण शहरी भागातील नागरिकांचे जनजीवन व्यथा बातम्या राजकारणातील घडामोडी प्रसिद्ध करण्यासाठी माझ गाव माझे शहर या पेपरची स्थापना करण्यात आली

Leave a Reply

error: Only Reporters Login

Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading