परंडा : पंढरीच्या विठुरायाच्या ओढणी निघालेल्या संतश्रेष्ठ भगवान बाबा महाराज पालखी सोहळ्याचा आज शुक्रवारी परंडा शहरात प्रवेश झाला. येथील कल्याण सागर विद्यालयाच्या प्रांगणात भाजपा प्रदेश सरचिटणीस माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी सहपरिवार पालखीचे स्वागत केले. कल्याण सागर विद्यालयाच्या वतीने वारकऱ्यांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते. येथील पाहुणचार स्वीकारल्यानंतर बाबांची पालखी दुपारी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली.फुलवृष्टी करुन पालखीचे स्वागत केले. संतश्रेष्ट भगवान बाबा यांच्या पादुकांची ठाकुर यांनी सपत्नीक पुजा केली. कल्याणसागर समुहाच्या वतीने पालखीतील वारकऱ्यांसाठी शाळेच्या प्रांगणामध्ये १० हजार वारकऱ्यांच्या महाभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. महाप्रसादाच्या वाटपासाठी प्रशालेचे २०० विद्यार्थी विद्यार्थीनी कार्यरत होते. भोजनाच्या व्यावस्थेची जवाबदारी मुख्याध्यापक चंद्रकांत पवार, मुख्याध्यापक किरण गरड, चंद्रकांत तनपुरे, महादेव नरुटे, अजीत गव्हाणे, रजणी कुलकर्णी, भारत थिटे, सचिन शिंदे, प्रशांत कोल्हे, आमोल कोकाटे, नरसिंह सोणवने, गणेश पवार यांनी उत्तमरित्या संभाळली. कल्याण सागर समुहाचा पाऊणचार घेऊन पालखी अवारपिंपरीच्या दिशेने मार्गस्थ झाली. पालखी शहरातून पदभ्रमण करीत असताना भाविकांनी भगवानबाबाच्या पादुकांचे दर्शन घेतले.
Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)
Subscribe to get the latest posts sent to your email.