परंडा प्रतिनिधी (माझं गांव माझं शहर) दि. (17) रोजी परांडा येथील शासकीय विश्राम गृह येथे डी.बी.ए समूहाच्या वतीने 350वी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी माननीय डी.बी.ए समूह संस्थापक /अध्यक्ष दयानंद बनसोडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष राहुल बनसोडे एडवोकेट दयानंद धेंडे राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक जिल्हा नेते गनीभाई हावरे बौद्धाचार्य दिलीप परिहार यांनी सामुदायिक राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे दीप धूप प्रज्वलन करून पूजा केली यावेळी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या जीवनावर मा दयानंद बनसोडे,एडवोकेट दयानंद घेंडे, लक्ष्मण शिंदे (देवगाव),दत्तात्रय पाटील( लोहारा) यांनी विचार मांडले यावेळी , सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा सरचिटणीस घनश्याम शिंदे, प्रहारचे तालुका अध्यक्ष आप्पासाहेब तरटे साहेब, सामाजिक न्याय विभागाचे तालुका कार्याध्यक्ष रंगनाथ ओव्हाळ, समाधान ओव्हाळ,अमर गायकवाड, बाळासाहेब चतुर, सिताराम नरोटे छगन चौधरी, संदिपान कांबळे, नागेश थोरात, सम्यक धेंडे सूर्योदय सरवदे, महिला लक्ष्मीबाई जाधव, आरती बनसोडे, सुषमा बनसोडे, संगीता बनसोडे, संगीत थोरात, सुजाता साळवे, इत्यादी महिला व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होत्या शेवटी आभार प्रदर्शन दयानंद बनसोडे यांनी मांडले
Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)
Subscribe to get the latest posts sent to your email.