परंडा-प्रतिनिधी(दि.१६) मराठ्यांचे क्रांतीसुर्य अ.भा.छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कै. अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी प्रमाणे छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने बाजार समिती समोर परंडा येथे जारच्या पाणपोई चे उदघाटन पोलिस निरीक्षक मा. श्री. विनोद इज्जपवार साहेब यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आले.
सर्व प्रथम कै.अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या प्रतिमेस मान्यवारांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव सचीन पाटील साहेब, मराठवाडा संपर्क प्रमुख अमर भाई शेख, जिल्हा उपाध्यक्ष आकाश जेधे, बिट अंमलदार बळीराम शिंदे साहेब, पोलीस निरीक्षक गजानन मुळे साहेब, पोलीस उपनिरीक्षक कांबळे साहेब, पोलीस हेड कॉन्स्टेबल पवार साहेब, बाबुराव तनपुरे, ज्योतीराम घोगरे, श्रीराम कोकाटे, सीताराम सातपुते, संतोष वारे, तालुका विधी सल्लागार महेश चोपडे शेतकरी आघाडीचे जिल्हाउपाध्यक्ष राहुल गाढवे, शहर उपाध्यक्ष हरिभाऊ आदमीले, तालुका अध्यक्ष सुधीर लटके, नवनाथ गटकळ अध्यक्ष कारला, माजी सरपंच खासगाव पंडित आबा जगदाळे, धर्मा जगदाळे, पिंपरखेड माजी सरपंच नागनाथ थोरात, मुस्तफा जिनेरी, किरण डाके, बापू हावळे, रमेश हिवरे, बबन हेळकर, प्रशांत गरड, नंदकुमार कुंभार, अमोघ मस्के,राजेंद्र शिर्के, गोपीनाथ खैरे, मुज्जू बागवान, सोयल पठाण, चेयरमन दत्ता सातपुते आदी कार्यकर्ते व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)
Subscribe to get the latest posts sent to your email.