माझं गाव माझं शहर :-परंडा, दि. ७- शहरातील शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी, नागरिकांची बावची रस्त्यावरील खड्यांमुळे फरपट सुरू होती. रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी थेट तहसील कार्यालय गाठून तहसीलदारांना निवेदन दिले होते. वारंवार दुरुस्तीची मागणी करून देखील जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना घाम फुटला नाही.
राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या कानावर या रस्त्याबाबत आरपीआयचे प्रदेश सरचिटणीस संजयकुमार बनसोडे यांनी घातली. सावंत यांनी भैरवनाथ शुगर वर्क्स कारखान्याच्या माध्यमांतून बावची चौकातील रस्त्यावर मुरुम टाकून खड्डे बुजवण्यात आल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांना दिलास मिळाला आहे. बावची रस्त्याची दूरवस्था झाल्याने शिक्षण महर्षी गे. शिंदे महाविद्यालय, ज्ञानभाग्य औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, महात्मा गांधी विद्यालयातील हजारो विद्यार्थी, नागरिकांना या रस्त्यावरून ये-जा करताना तारेवरची कसरत करावी लागत होती. पावसाचे पाणी रस्त्यावरील खड्यात साचल्याने या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना देखील मोठा त्रास सहन करावा लागत होता. याविषयी विद्यार्थी व नागरिकांची गैरसोय दूर व्हावी या उद्देशाने पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी या रस्त्यावरील खड्डे मुरुमाने बुजवण्यासाठी दोन जेसीबी, चार टिप्पर लावून मुरुमाची रोडरोलरने दबाई केली.
Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)
Subscribe to get the latest posts sent to your email.