मुंबई (तानाजी घोडके) राज्यातील लाखो दिव्यांगाचे पालनहार , हृदय सम्राट दिव्यांग भूषण ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी दिव्यांग मंत्रालय निर्माण करण्यासाठी सिंहाचा वाटा उचलला म्हणून दिव्यांग मंत्रालय स्थापन झाले म्हणून अध्यक्षपदाची धुरा बच्चू कडू यांच्याकडे देण्यात आली ती यशस्वीपणे पार पाडत होते परंतु दिव्यांग आयुक्तालय स्थापन झाल्यापासून दिव्यांग ना कोणत्याही सोयीसुविधा मंत्रालयामार्फत पुरवण्यात आल्या नाहीत किंवा इतर राज्यात पेक्षा दिव्यांगांना महाराष्ट्र मध्ये मिळणारे मानधन कमी आहे मानधन वेळेवर मिळत नाही स्थानिक स्वराज्य संस्था 5% निधी खर्च करत नाही या मंत्रालयाला अजूनही स्वतंत्र मंत्री नाही आणि सचिव पण नाही जिल्ह्याच्या ठिकाणी स्वतंत्र कार्यालय नाही पद भरती नाही इतर अनेक गोष्टी ज्या झाल्या नाहीत त्यामुळे मी दिव्यांगाची फसवणूक करू शकत नाही मला दिव्यांगाना न्याय मिळवून द्यायचा आहे मी दिव्यांगा बरोबर बेईमानी करणार नाही हे कदाबी शक्य नाही म्हणून बच्चू कडू यांनी दिव्यांग कल्याण आयुक्तालय अध्यक्ष या पदाचा राजीनामा दिला आहे आता दिव्यांग बांधवाने कोणाकडे दाद मागावी हा संभ्रम दिव्यांगाच्या मनामध्ये निर्माण झाला आहे याकडे महाराष्ट्र शासन कोणाच्या खांद्यावर अध्यक्ष पदाची धुरा देते हे पाहणे गरजेचे आहे
Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)
Subscribe to get the latest posts sent to your email.