अनाळा , दि १५ – परंडा तालुक्यातील अनाळा येथे दि. १५ रोजी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा ] धाराशिव व तालुका कृषी अधिकारी यांच्या वतीने २०२४- २५ महिला किसान दिनानिमित महिलांना परसबागेमध्ये भाजीपाला लागवड व शेंद्रिय शेती एक दिवशीय प्रशिक्षण देण्यात आले . प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन आत्मा चे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक अमोल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले . कार्यक्रमात सेंद्रिय शेती प्रशिक्षक अभिजित पवार यांनी महिलांना सेंद्रिय शेती व परसबागे विषयी अनमोल मार्गदर्शन केले . तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक अमोल पाटील यांनी महिलांना विविध शासकिय योजनेविषयी माहिती दिली . उपस्थित ५० महिलांना मान्यवरांच्या हस्ते भाजीपाला बियाणे किट वाटप करण्यात आले .कार्यक्रमास लघु उदयोग सल्लागार गणेश नेटके , प्रोग्यान फाऊंडेशन च्या तालुका समन्वयक नौशाद शेख , अन्नपूर्णा ठोसर यांच्या सह शेतकरी महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अन्नपूर्णा ठोसर यांनी केले तर आभार गणेश नेटके यांनी केले . कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री कालिका देवी सेंद्रिय शेतकरी गटाचे अध्यक्ष अलिम शेख यांनी अथक परिश्रम घेतले .
अनाळा ता . परंडा येथे महिला किसान दिनानिमित्त शेतकरी महिलांना भाजीपाला बियाणे किट वाटप करण्यात आले यावेळी तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक अमोल पाटील , लघुउदयोग सल्लागार गणेश नेटके , प्रोग्यान फाऊंडेशन च्या नौशाद शेख , प्रशिक्षक अभिजित पाटील व महिला .
Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)
Subscribe to get the latest posts sent to your email.