परंडा, ता. ९ (माझं गाव माझं शहर ) : नाथांच्या पालखीचे आतषबाजीत स्वागत परंड्यामध्ये ठिकठिकाणी भक्तिमय वातावरण, दर्शनासाठी मोठी गर्दी ‘पंढरीशी जा रे आल्यांनो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग ! वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावीळ !! टाळ-मृदंगाच्या गजरात भानुदास एकनाथ, हरिनामाचा जयघोष करीत आषाढीवारीसाठी निघालेल्या श्रीक्षेत्र पैठण येथील संत एकनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याचे मंगळवारी (ता. ९) सायंकाळी सहाला येथे आगमन झाले. शहराचे प्रवेशद्वार असलेल्या नाथचौकात मोठ्या भक्तिभावात, जल्लोषात नागरिकांनी पालखीचे स्वागत केले. दर्शनासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. धाराशिव जिल्ह्यात पालखी सोहळ्याचे आगमन होताच वारकऱ्यांना खराब रस्त्यांचा सामना करावा लागत आहे. खर्डा ते तिंत्रज हा तीन किलोमीटरचा रस्ता बिकट झाला आहे. त्यामुळे आमचे सुमारे ८ ते ९ किलोमीटर अंतर वाढले आहे. शासनाने पालखीमार्गाची दुरुस्ती करावी. सोलापूर हद्दीतील सर्वच रस्ते मजबूत झाले आहेत.

  • रघुनाथबुवा गोसावी, पालखीप्रमुख
    संत एकनाथ महाराज पालखी सोहळ्याचे पैठणहून २९ जूनला पंढरपूरकडे प्रस्थान झाले आहे. मजल दरमजल करीत आज सायंकाळी सहाला पालखी सोहळा येथे दाखल झाला. पालखीचे आगमन होताच मोठी आतषबाजी करण्यात आली. मानकरी मोहन देशमुख, मुकुंद देशमुख, मधुकर देशमुख, माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, धनेश्वरी शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ. प्रतापसिंह पाटील, जनार्दन मेहेर, पालिका कर्मचाऱ्यांनी पुष्पवृष्टी करीत सोहळ्याचे स्वागत केले. विकास कुलकर्णी, धीरजसिंह ठाकूर, मधुकर लोखंडे, माजी नगरसेवक मकरंद जोशी, नाभिक संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष नागेश काशीद, प्रमोद वेदपाठक, अजित पाटील,
    शहरात ठिकठिकाणी पालखीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी होती. ठिकठिकाणी मोठी आतषबाजी करण्यात आली. मंगळवारपेठेतील मोहन देशमुख, मुकुंद देशमुख यांच्या वाड्यावर परंपरेनुसार पालखी सोहळा मुक्कामी असतो. या ठिकाणी भजन, कीर्तन, हरिजागर होतो. बुधवारी (ता. १०) सकाळी दहाला मुंगशीमार्गे (ता. माढा) हा पालखी सोहळा मार्गस्थ होणार आहे. मुजावर, महेंद्र देशमुख व संतोष देशमुख आदींसह नागरिक उपस्थित होते.
    या पालखी सोहळ्याला ४२५ वर्षांची परंपरा आहे. चौदावे नाथवंशज रघुनाथबुवा नारायण पालखीवाले या पालखी सोहळ्याचे प्रमुख आहेत. त्यांच्यासोबत ज्ञानेशबुवा, योगेशबुवा, रखमाजी महाराज, रावसाहेब महाराज गोसावी आहेत. या पालखी सोहळ्यादरम्यान मिडसांगवी, पारगाव घुमरे, नांगरडोह, कव्हेदंड या चार ठिकाणी रिंगण सोहळा होतो.

Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)

Subscribe to get the latest posts sent to your email.

By माझं गांव माझं शहर(बातमीपत्र)

ग्रामीण शहरी भागातील नागरिकांचे जनजीवन व्यथा बातम्या राजकारणातील घडामोडी प्रसिद्ध करण्यासाठी माझ गाव माझे शहर या पेपरची स्थापना करण्यात आली

Leave a Reply

error: Only Reporters Login

Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading