परंडा(दि२९)
शासनमान्य ब्रह्मवार्ता वधुवर विवाह संस्था परंडा जि धाराशिव याच्या वतीने राज्यातील ब्राह्मण वधुवर याच्या साठी राज्य स्तरीय वधुवर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे संचालक श्रीराम विद्वत यांनी दिली आहे. सदरील मेळाव्यात प्रथम वर घटस्फोटित विधवा विधुर सापत्य विनाआपत्य पुरोहित व्यवसाईक शेती व्यवसाय करणारे व ब्राह्मण समाजातील सर्व वधुवर यांना या मेळाव्यात सहभागी होता येईल. मेळाव्याची वेळ सकाळी ११ ते ५वाजे पर्यंत ठिकाण श्री कल्याण स्वामी मठाजवळ सोमवार गल्ली परंडा मेळाव्यात सहभागी होण्यासाठी सहभाग शुल्क ५०० रुपये राहिल दोन व्यक्ती च्या भोजनासह तरी राज्यातील ब्राह्मण समाजातील सर्व विवाह इछुक वधुवर यांनी उपस्थित राहावे.मेळाव्यात सहभागी वधुवर यांना १० दिवसांनी पी डी एफ फाईल वैयक्तिक नबंर दिली जाईल नांव नोदणी दि ३०/४/२४ पर्यंत करणे आवश्यक आहे तसेच ब्रह्मवार्ता वधुवर विवाह संस्था परंडा यांच्या कडील वधुवर याचे कडील वधुवर याची स्थळे पाहण्यासाठी उपलब्ध असतील. तसेच या मेळाव्यात जेष्ठ वधुवर संचालक हेमंतराव कुलकर्णी पंढरपूर याच्या सह इतर संचालक यांच्या कडून आपल्या ला मार्गदर्शन मिळणार आहे. मेळाव्याचे आयोजन श्रीराम विद्वत दैनिक तरुण भारत वार्ताहर परंडा तथा ब्रह्मवार्ता वधुवर विवाह संस्था संचालक व रविंद्र दुसे जेष्ठ वधुवर संचालक लातूर यांनी केले आहे.
Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)
Subscribe to get the latest posts sent to your email.