जोतीबाच्या काठीची उत्साहात मिरवणुक .
कंडारी/ प्रतिनिधी (दि ९)
कंडारी येथे परंपरेनुसार प्रत्येक वर्षी जोतीबाच्या काठीची वाजत गाजत मिरवणूक काढतात . या बर्षाही गुढीपाडव्या दिवशी जोतीबाच्या मानाच्या काठीची मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली. प्रथम श्री काळभैरवनाथास भेट देवून गावात प्रदक्षणा घालण्यात आली . यावेळी भाविक गुलालाची उधळण करत जोतीबाच्या नावन चांगभल चा जयघोष करत गुलालात न्हावून निघाले . मिरवणुकीनंतर जाधव यांच्या वाडयात जोतीबाची काठी विसावली . पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करुन विधिवत पुजा करण्यात आली. यानंतर चैत्र पौर्णिमेला जोतिबाच्या यात्रेस देवाला भेटण्यास काठीचे प्रस्थान होते .
यावेळी जोतिबा काठीचे सर्व मानकरी शरद जाधव, लाला जाधव, नवनाथ जाधव, भाऊ जाधव, बाबासाहेब जाधव, रंगनाथ जाधव,सतिष जाधव, संतराम जाधव, रामदास शिंदे, नितीन रेवडकर, गोकूळ जाधव, हनुमंत शिंदे, विक्रम जाधव, भारत जाधव, संजय शिंदे, कृष्णा जाधव, नागेश मोरे, नाथा रेवडकर, दत्ता रेवडकर , यांचे सह भाविक भक्त मोठया संख्येने उपस्थीत होते .
Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)
Subscribe to get the latest posts sent to your email.