परंडा दि ११ ( प्रतिनिधी ) मुस्लिम बांधवाकडून पवित्र अशा रमजान महिन्यात महिनाभराचे रोजे (उपवास) केले जातात . उन्हाळ्याच्या या दिवसात हे रोजे करणे म्हणजे काही सोपं काम नाही दिवसभर काहीही न खाता न पिता केला जाणारा रोजा (उपवास) बऱ्याच वेळा मोठ्यांनाही निभवत नाही . मात्र परंडयातील रजा हाफीज समीर बागवान या पाच वर्षीय चिमुकल्याने रविवारी आयुष्यातील पहिला रोजा केला आहे त्याचे अनेकांनी कौतुक केले .
मुस्लिम समाजातील लहान-मोठे प्रत्येक जण रमजान महिन्यात महिनाभर रोजे (उपवास) करतात पहाटे पाच नंतर ते रात्री पावणेसात वाजेपर्यंत काही न खाता-पिता रोजे (उपवास) करतात
Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)
Subscribe to get the latest posts sent to your email.