परंडा,ता.१ (प्रतिनिधी ) व्हॉईस ऑफ मीडिया तालुका शाखा वतीने शनिवार ता. १ रोजी तालुका अध्यक्ष निवडीची ऑनलाईन पद्धतीने निवड प्रक्रिया होवुन नुतन तालुकाध्यक्षपदी मुजीब काझी यांची बहुमताने निवड करण्यात आली.
येथील शासकीय विश्रामगृहात परंडा तालुका व्हाईस ऑफ मीडिया पञकार संघटनेची बैठक आयोजीत करण्यात आली होती. या बैठकीत ऑनलाईन प्रक्रियेच्या माध्यमातून तालुका अध्यक्ष पदाची निवड करण्यात आली. सदरील निवडी मध्ये उमेदवार – मुजीब काझी, संतोष शिंदे,शंकर घोगरे उमेदवार होते. ऑनलाईन निवड प्रक्रिये मधून मुजीब काझी यांना अठरा १८ मते, संतोष शिंदे-४ मते,शंकर घोगरे यांना एक (१) मतदान मिळाले.
सदर निवड प्रक्रियेतून बहुमताने निवडून आलेले पत्रकार मुजीब काझी यांच्या कडे सर्व पत्रकार बांधवाच्या वतीने नुतन तालुकाध्यक्ष पदाचा कार्यभार देण्यात आला.या बैठकीस जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश काशीद, जिल्हा संघटक रवींद्र तांबे, जिल्हा सदस्य अलीम शेख व कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ पत्रकार श्रीराम विद्वत यांच्या मार्गदशनाखाली ही निवड प्रक्रिया शासकीय विश्रामगृह परंडा येथे पार पडली. यावेळी पञकार प्रमोद वेदपाठक, तालुका सचिव तानाजी घोडके, श्रीराम विद्वत,आप्पासाहेब शिंदे, हनुमंत मस्तुद, फारूख शेख, दत्ता नरुटे, रावसाहेब काळे, समीर ओव्हाळ, नाना केसकर, पांडुरंग ठोसर, साजीद शेख,उत्तरेश्वर शिंदे, धनंजय गोफणे, रावसाहेब गायकवाड,विजय मेहेर आदिसह पत्रकार बाधंव उपस्थित होते.या निवडीबद्ल पञकार मुजीब काझी यांचा सत्कार करण्यात आला.
Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)
Subscribe to get the latest posts sent to your email.