परंडा (माझं गांव माझं शहर )महसूल कर्मचारी याच्या वतीने तहसीलदार परंडा यांना दिलेल्या निवेदन पुढे म्हटले आहे की, श्री.जरिचंद गोडगे, रा.रोसा हल्ली मुक्काम बार्शी आज दि.७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.४५ वाजता तहसिल कार्यालय परंडा येथील महसूल विभागात येऊन श्री. जगन्नाथ खुने यांना मोजे खासगाव येथील भाऊसाहेब यांचे सन 2022 चे तक्रार अर्जावर काय कार्यवाही केली अशी विचारणा केली. सदरचा तक्रार अर्ज हा श्री. भाऊसाहेब यांचा असून, श्री. जरीचंद गोडगे यांचा सदर अर्जाशी कोणत्याही प्रकारचा संबंध नसताना केवळ हस्तक (एजंट) म्हणून श्री. गोडगे तहसिल कार्यालय परंडा येथे वारंवार वावरत असल्याचे दिसून येत आहे.
खुने हे अर्ध-न्यायिक प्रकरणातील सुनावणीसाठी तहसिलदार यांचे दालनाकडे जात असताना,जगन्नाथ खुने याचे म्हणने ऐकून न घेता खुने, महसूल सहाय्यक यांना दमदाटी व अश्लिल भाषेत शिवीगाळ करून अंगावर धावत येऊन दहशत निर्माण करुन धक्काबुक्की करून मारहाण केली व तुला बघुन घेतो” अशी धमकी दिली. तसेच कार्यालयात गोंधळ घातला व शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला आहे. त्यानंतर गोडगे यांनी तहसिलदार यांचे दालनात, त्यांचे समक्ष खुने यांना शिवीगाळ केली.
सदर घटनेचा आम्ही तीव्र निषेध करत आहोत. त्या निषेर्धात, परंडा तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांनी जरीचंद गोडगे यांचेवर फौजदारी कारवाई होईपर्यंत आज दि.७ फेबुवारी २०२५ पासून जगन्नाथ खूने, मंदार कदम, मोहिलवाड एन के . श्रीमती लवटे , पठान एम .एम . मडळ अधिकारी तोरकडे एन बी साळूंके डी के याच्या सह कोतवाल शिपाई सर्व महसूल कर्मच्यारी यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवदनावर यांच्या सहया आहे ०७ फेब्रुवारी पासून बेमुदत कामबंद आंदोलन करत आहोत.
Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)
Subscribe to get the latest posts sent to your email.