परंडा दि २७ ( प्रतिनिधी ) येथील नुकतेच दिल्ली येथे झालेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात परंड्याचे जेष्ट साहित्यिक तु.दा.गंगावणे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवनावर आधारित ‘ प्रकाशमान ‘ कविता तसेच सामाजिक संदेश देणारे कथा कथनाचे सादरिकरण करून उपस्थितांची मने जिंकली .
परंडा विधानसभा मतदार संघातील जेष्ट साहित्यिक तु.दा.गंगावणे यांना या अधिवेशणाचे विशेष निमंत्रण होते . तु.दा.गंगावणे लिखीत गळगण ही कांदबरी सर्व परिचित आहे . तसेच सामाजिक क्षेत्रात ही त्यांचे भरीव योग्यदान आहे . दिल्ली येथील साहित्य संमेलनाच्या सहभागाबद्दल व्हाईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्लीहुन परंड्यात आल्यावर तु दा गंगावणे यांचा फेटा शाल पुष्पगुच्छ व पुस्तक देऊन सन्मान केला . यावेळी व्हॉईस ऑफ मिडियाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश काशीद , तालुकाध्यक्ष प्रमोद वेदपाठक , तालुका कार्यध्यक्ष मुजीब काझी , सचिव तानाजी घोडके उपस्थित होते.
Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)
Subscribe to get the latest posts sent to your email.