परांडा शहरांमध्ये मा. आमदार तथा भाजपा प्रदेश सरचिटणीस श्री. सुजितसिंहजी ठाकूर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त दिग्गज नेते गण उपस्थित .सुरेश धस यांनी सांगितले की विद्यार्थी दशेपासूनच त्यांनी संघाच्या विचारांची शिदोरी घेऊन समाजसेवेचा प्रण केला. मिळेल ती जबाबदारीला न्याय देण्याचा त्यांना प्रामाणिक प्रयत्न केला.
लोकनेते स्व. गोपीनाथजी मुंडे यांच्यासोबत काम करत त्यांनी उत्कृष्ट संघटन कौशल्य आत्मसात केले. त्यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या धाराशिव, बीड आणि लातूर भागातून भाजपाच्या उमेदवार म्हणून मला विजयी करण्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आणि दिलेल्या प्रेमाबद्दल मी त्यांचे आभार मानतो. ईश्वर त्यांना उदंड आयुष्य देवो हीच सदिच्छा.
यावेळी ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री श्री. जयकुमार गोरे, आमदार श्री. राणाजगजीत सिंह पाटील, आमदार श्री. विजयकुमार देशमुख, मा. आमदार श्री. राजेंद्र राऊत, भाजप जिल्हाध्यक्ष श्री. संताजी चालुक्य, मा. जिल्हाध्यक्ष श्री. नितीन काळे, श्री. दत्ताभाऊ कुलकर्णी, श्री. खंडेराव चोरे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजेसाहेब निंबाळकर, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष नंदाताई पानपुडे, तालुकाध्यक्ष ॲड. गणेश खरसडे, शहराध्यक्ष उमाकांत गोरे, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ॲड. संतोष सूर्यवंशी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य अल्पसंख्यांक मोर्चा श्री. जहीर चौधरी, श्री बाबासाहेब जाधव आणि सुखदेव टोनपे व कार्यकर्ते उपस्थित होते.
Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)
Subscribe to get the latest posts sent to your email.