परंडा(माझं गांव माझं शहर ) परंडा तालुक्यातील दिव्यांग बांधवांना दिव्यांगत्वाचे ऑनलाईन प्रमाणपत्र मिळावे व तालुक्यातील दिव्यांग प्रमाणपत्र पासून वंचित राहू नये या उद्देशाने दिव्यांग उद्योग समूहाचे राज्यअध्यक्ष तानाजी घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली परंडा येथे दिनांक 7 फेब्रुवारी 2025 रोजी दिव्यांग तपासणी शिबिर पार पडले.
यासाठी जिल्हा शैल्य चिकित्सक अधिकारी धाराशिव उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय परांडा यांच्या वतीने हा कॅम्प यशस्वी पार पाडण्यात आला
या शिबिरामध्ये अस्तिव्यंग दिव्यांग , मतिमंद दिव्यांग, अंध अशा एकूण 45दिव्यांग नागरिकांची तपासणी करण्यात आली.
या तपासण्या करण्यासाठी धाराशिव येथील तज्ञ डॉक्टर डॉ.ज्योती कल्याणी डॉ आयुश शिंदे डॉ खंडागळे यांनी कामकाज पाहिले हा कॅम्प यशस्वी करण्यासाठी दिव्यांग उद्योगसमूहाचे जिल्हाप्रमुख तानाजी घोडके शहराध्यक्ष गोरख देशमाने सरपंच कार्ला संतोष भुजे . सामाजिक कार्यकर्ते कानिफनाथ सरपने शिक्षण विभागातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी कामकाज पाहणारे कर्मचारी हाजगुडे सर जाधव मॅडम व सरकारी दवाखाना बापू खताळ डॉक्टर शेटे आदी परांडा येथील कर्मचारी यांनी सहकार्य केले.
Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)
Subscribe to get the latest posts sent to your email.