जेकटेवाडी प्रतिनिधी: परंडा तालुक्यातील शिधापत्रिकेतील सर्व सदस्यांची ई-केवायसी करावी असे आवाहन तहसिलदार निलेश काकडे यांनी केले आहे.सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील सर्व पात्र लाभार्थ्याना जाहीर आवाहन करण्यात येते की, राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत् अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना अंतर्गत शिधापत्रिका धारकांना शासकीय अनुदानीत अन्न धान्याचा लाभ सुरू ठेवण्यासाठी कुटुंबातील रेशनकार्ड मध्ये नोंदणी केलेल्या सर्व सदस्यांचे ई-केवायसी मुदतीत पूर्ण करणे बंधनकारक आहे. ज्या सदस्यांचे ई-केवायसी पूर्ण होणार नाही त्यांचा अन्नधान्याचा लाभ बंद होणार आहे, असे निर्देश अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मार्फत देण्यात आले आहेत.
तरी परांडा तालुक्यातील शिधापत्रिकेतील सर्व सदस्यांची ई-केवायसी करणेसाठी दिनांक 08/02/2025 ते 15/02/2025 या कालावधीमध्ये गावातील रास्तभाव धान्य दुकान ठिकाणी रेशन दुकानदार यांचे मार्फत ई-केवायसी करणे करीता कॅम्प चे आयोजन करण्यात येणार आहे. तरी परांडा तालुक्यातील सर्व शिधापत्रिकाधारकांनी रेशनकार्ड मधील सर्व सदस्यांची ई-केवायसी करून घ्यावी. जेणेकरून आपल्याला मिळणा-या अन्नधान्याचा लाभ बंद होणार नाही, असे आवाहन निलेश काकडे तहसिलदार परंडा यांच्याकडून करण्यात येत आहे.
Discover more from माझं गांव माझं शहर (बातमीपत्र)
Subscribe to get the latest posts sent to your email.